मुंबई: आज महराष्ट्रात शेवटच्या चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान हा प्रत्येकांचा हक्क असल्याने तो बजावला पाहिजे असे आवाहन सेलिब्रेटी करत असतात, त्यामुळे त्यांनी स्वत: मतदान करणे आवश्यक असतात. दरम्यान आज मराठी सेलिब्रेटींनी उत्साहाने मतदानात भाग घेतला. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीने मतदानचा हक्क बजावला आहे. इन्स्टाग्रामवर स्पृहाने फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने डोबिंवलीमधल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर फोटोदेखील शेअर केला आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने कर्जतमध्ये मतदान केले. ऐवढेच नाही तर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मतदान करण्यास सांगितले आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदारने देखील अंबरनाथमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.