भुसावळ, दि.7:
येथील श्री. संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य श्रीधर खनके, माजी मुख्याध्यापिका सौ. मंगला वाणी उपस्थित होते.
दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी निमित्त जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यात श्याम चंदा है, आयो रे नंदलाल, यशोदाजी के घर, जो है अलबेला, दांडिया नृत्य, राधाकृष्ण रासलीला, मटकी फोड गीत अशा राधा कृष्णाच्या जीवनावर आधारित विविध गितांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. दहीहंडी नंतर गोपाळकाल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अलका सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले तर आभार आनंद सपकाळे यांनी मानले.