जामनेर प्रतिनिधी ।
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,जळगाव व इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समान संधी केंद्र सामाजिक न्याय पर्व- २०२३ अंतर्गत आज सकाळी ८ वा. इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल सचिव किशोर महाजन, उपाध्यक्ष विनीत महाजन, संचालक फकीरा काका धनगर, संचालक दीपक महाजन, मुख्याध्यापक प्रा पाटील, उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. के एन मराठे, उपमुख्याध्यापक एस आर चव्हाण, पर्यवेक्षक प्रा. के. डी. निमगडे, समान
संधी केंद्र प्रभारी प्रा. समीर घोडेस्वार आदी मान्यवराची उपस्थित होती. ध्वजारोहण प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जे.पी पाटील दि. ३१ मे रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहे त्यांचा जाहीर सत्कार शाल, बुके, श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, बी पी बेनाडे, जी डी कचरे, उच्च माध्य. विभागाचे समान संधी केंद्र समन्वयक तथा क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार, यांनी तर रांगोळी सजावट कला पी शिक्षिका प्रा. माधुरी तायडे, प्रा. माधुरी महाजन, प्रा. मनीषा घडेकर, प्रा. धनश्री पाटील व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.