रघुराम राजन यांनी सोडले मौन; केंद्रीय बँका सिटबेल्ट सारख्या

0

नवी दिल्ली-वाहन चालवतांना सिटबेल्ट लावणे फार गरजेचे असते. सिटबेल्ट न लावल्यास अपघात होऊन आपला जीव जाऊ शकतो. तसेच केंद्रीय बँका या सिटबेल्ट प्रमाणे असून उद्योगांना तारण्यासाठी त्याची आवश्यकता आहे असे मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. सध्या केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये वाद सुरु आहे. केंद्र सरकारने आरबीआयमध्ये हस्तक्षेप केले आहे, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल हे देखील सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. आरबीआय ही स्वायत्त संस्था असून केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असे आरोप सरकारवर होत आहे. आरबीआयसोबतच सीबीआयचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आहे.