नवी दिल्ली: सीबीएसईच्या दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत बरीच चर्चा सुरु होती. निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविली जात होती. दरम्यान आज सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 3 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची तारीख निश्चित नव्हती, आज अचानक निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा आश्चर्याचा धक्काच मानला जात आहे.