‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ची स्थापना; अमित शहा आणि एस. जयशंकर यांना स्थान

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ (CCS) म्हणजेच सुरक्षेतेच्या मुद्द्यासांठी कॅबिनेट कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समावेश आहे. अमित शहा आणि एस. जयशंकर यांना पहिल्यांदाच या कमिटीत स्थान मिळाले आहे. तर राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामण हे आधीच्या सरकारमध्ये सुद्धा होते. देशातील सुरक्षेतेसंदर्भातील सर्व निर्णय ही कमिटी घेते.

मोदी सरकारमध्ये या कमिटीत राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन आधीपासून आहेत. मात्र, त्यांच्याकडील जबाबदारी बदलली आहे. राजनाथ सिंह आधी गृहमंत्री म्हणून या कमिटीत होते, तर निर्मला सीतारमण संरक्षणमंत्री म्हणून होत्या. तर अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचा समावेश समावेश होता. मात्र, आता मोदी सरकार-2 मध्ये निर्मला सीतारामण यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आले. त्यामुळे या दोघांसह अमित शहा आणि एस. जयशंकर यांचा या कमिटीत समावेश करण्यात आला आहे.