नवी दिल्ली: केंद्र सरकारने खाजगी तसेच सरकारी नोकरदारांना मोठा झटका दिला असून, प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात केली आहे. आता पी.एफच्या रकमेवर ८ टक्के ऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. हे नवीन दर जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थ खात्याने या विषयी माहिती देतांना सांगितले की, जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होते. १० बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर जमा रकमेवर ७.९ टक्के व्याज मिळणार आहे.
यांना बसणार फटका सेन्ट्रल सर्विसेस, कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया), स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड, जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस), डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड, आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड, इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड