नवी दिल्लीः दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. किमान आधार मूल्यात 85 रुपयांची वाढ झाली आहे. आज बुधवारी २३ रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गव्हाच्या पिकाचे आधार मूल्य 1840 रुपयांवरून वाढवून 1925 रुपये करण्यात आले आहे. सरकारवर अतिरिक्त 3 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. देशात ऑक्टोबर ते मार्चदरम्यान येणाऱ्या सर्वच पिकांना रब्बी हंगामातील पीक समजलं जातं. ऑक्टोबरला जेव्हा पाऊस परतीच्या प्रवासाला लागतो, तेव्हा या पिकांची पेरणी केली जाते. मार्च आणि एप्रिलदरम्यान या पिकांची कापणी केली जाते. यादरम्यान पिकांसाठी कमी पाण्याची आवश्यकता असते.