नवी दिल्ली: सोशल मीडियातील बदनामीचे प्रकरण देशभरात गाजत आहे. चुकीची माहिती अनेकदा पसरविली जाते, त्याद्वारे एखाद्याची बदनामी होते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. फेसबुक, ट्विटर यासारखी समाज माध्यमे, नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांच्यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना लागू होतील.
Social media platforms on being asked either by court or govt authority will be required to disclose 1st originator of mischievous tweet or message. This should be in relation to sovereignty of India, security of state, relations with foreign states, rape etc: Union Min RS Prasad pic.twitter.com/tU1GhO3ueN
— ANI (@ANI) February 25, 2021
सोशल मीडिया कंपन्यांना व्यवसाय करण्याबाबत कोणतीही मनाई नाही मात्र गैरवापर व्हायला नको. सोशल मीडियावर मॉर्फ्ड फोटो शेअर केले जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. संसदेत, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला आहे. त्यामुळेच सोशल मीडियासाठी नवे धोरण आणत असल्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
For OTT, there should be self-classification of content — 13+, 16+ and A categories. There has to be a mechanism of parental lock and ensuring compliance that children don't see that: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/3wes5FMzR5
— ANI (@ANI) February 25, 2021
या आहेत सूचना
*सोशल मिडीयाबद्दलची तक्रार सोडवण्यासाठी यंत्रणा तयार करावी लागेल. २४ तासांत तक्रार नोंदवून १४ दिवसांत तिचा निपटारा करावा लागेल.
*महिलांची बदनामी करणाऱ्या कंटेट २४ तासांत हटवावा लागेल
* सोशल मीडियाला तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक प्रमुख अधिकारी नियुक्त करावा लागेल. तो भारताचा नागरिक असावा
*एकाची निवड नोडल कॉन्टॅक पर्सन म्हणून करावी. ही व्यक्ती २४ तास कायदेशीर यंत्रणांच्या संपर्कात असेल
*दर महिन्याला येणाऱ्या तक्रारींचा अहवाल जारी करावा लागेल