नवी दिल्ली। मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच केंद्र सरकारला विविध करांपोटी सर्वात जास्त पैसा मिळाला आहे. यावर्षी केंद्र सरकारला करांसाठी सुमारे 17. 10 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. गत वर्षांच्या तुलनेत ही रक्कम 18 टक्के जास्त आहे. फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पाच्यावेळीस करांपोटी 16.97 लाख कोटी रुपये मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला होता. एप्रिल मार्च या कालावधीत प्रत्यक्ष करांमध्ये 14.2 टक्के वाढ झाल्यामुळे ही रक्कम 8.47 लाख कोटी इतकी झाली आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये 22 टक्के वाढ झाली असून ही रक्कम 8.63 एवढी आहे. त्यामुळे 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता करवसुलीसाठी ठरवण्यात आलेले लक्ष्य 100 टक्के पूर्ण झाले आहे.प्रत्यक्ष करांमध्ये कॉर्पोरट इन्कम टॅक्स आणि पसर्नल इन्कम टॅक्सचा समावेश होतो.
अंदाजपत्रकानुसार मार्च 2017 पर्यंत कॉर्पोरेट टॅक्समधून 13.1 टक्का आणि पर्सनल टॅक्समधून 18.4 टक्के एवढा कर गोळा करण्यात आल आहे. आयकराचा परतावा केल्यानतरही कॉर्पोरेट टॅक्समध्ये 6.7 आणि पर्सनल टॅक्समध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 दरम्यान 1.62 लाख कोटी रुपये परताव्यापोटी देण्यात आले आहेत. ही रक्कम 2015 ते 2016 वर्षादरम्यान देण्यात आलेल्या परताव्याच्या रकमेपेक्षा 32.6 टक्के जास्त आहे. 2016-17 वर्षात 2015-16 च्या तुलनेत प्रस्तावित अप्रत्यक्ष करापोटी 8.63 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. अप्रत्यक्ष करात केंद्रीय उत्पादन शुल्क, सर्व्हिस टॅक्स आणि कस्टम्सचा समावेश आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कापोटी मार्च 2017 पर्यंत 3.83 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 33.9 टक्क्यांनी जास्त आहे. 2016-17 या वर्षात राजस्थान आयकर विभागाने नवा इतिहास रचला. राजस्थान विभागाने मुंबई, बेंगळरू, गुजरात, दिल्ली सारख्या बड्या राज्यांना मागे टाकले आहे. राजस्थानमधून 53.4 टक्के करवसुली करण्यात आली. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमधून 27.4 करवसुली झाली आहे.