‘आप’नेते सत्येंद्र जैन यांच्या सीबीआय चौकशीस केंद्राकडून मंजूरी !

0

नवी दिल्ली-केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि ‘आप’नेते सत्येंद्र जैन यांच्यावर सीबीआयला अधिक संपत्तीच्या बाबतीत चौकशी करण्यास मंजूरी दिली.

यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सूडबुद्धीने ही कारवाई करत असून भाजप दिल्लीकरांचे दुश्मन आहे असे आरोप केले आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर २००९-१० आणि २०१०-११ दरम्यान कथित अकिंचन डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड, इंडो मेटल इंपेक्स प्राइवेट लिमिटेड, प्रयास इंफोसोल्यूशन प्राइवेट लिमिटेड आणि मंगलायतन प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड समवेत अनेक बोगस कंपनी सुरु केल्याचे आरोप आहे.

गृहमंत्रालयाने या बोगस कंपन्यांचा कोणताही व्यापार नव्हता. सत्येंद्र जैन यांनी कोलकातामधील जीवेंद्र मिश्रा, अभिषेक चोखानी आणि राजेंद्र बंसल यांच्या ५४ बनावट कंपन्यामार्फत २०१०-११ आणि २०१५-१६ दरम्यान १६.३९ कोटींचा अपहार केल्याचे सांगितले आहे.