केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

0

बंगळुरू – केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे रात्री ५९ व्या वर्षी निधन झाले. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री.शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनंत कुमार यांना कर्करोगाने ग्रस्त होते. अनंतकुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रात मंत्री होते. कर्करोगावर लंडनला उपचार घेत होते. नुकतेच, गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते.

अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अनंत कुमार यांचं योगदान कायम स्मरणात राहील. ते अतिशय असामान्य नेते होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्री मंडळातील सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. कुमार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे राष्ट्रपती यांनी ट्वीटरद्वारे सांगितले आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील अनंत कुमार यांना श्रद्धांजली अपर्ण करत दु:ख व्यक्त केले आहे.