केंद्रीय मंत्रिमंडळाची आठ गटात विभागणी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कामकाजाची गती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळातील 77 मंत्र्यांना आणि गटात विभाजित करण्यात आले आहे.

 

सरकारच्या कामकाजात पारदर्शकता वाढविणसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवणे हा या बैठकीचा हेतू होता. या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती एम नायडू हे देखील उपस्थित होते.

 

मंत्र्यांच्या आठ गटात प्रत्येकी ९ ते १० मंत्री असतील. एका केंद्रीय मंत्रीला समूह समन्वयक भरण्यात येईल. या सदस्यांची आपापसात चर्चा होईल. प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना यामुळे अधिक फायदा होईल.