नवी दिल्ली- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री भाजप नेते राजेन गोहेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यान कोर्टाने गोहेन यांना समन्स जारी केले असून ८ जानेवारीपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. २८ नोव्हेंबर रोजी हा समन्स जाहीर करण्यात आला आहे, परंतू काल ते सार्वजनिक करण्यात आले.
गोहेन यांनी माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप ते सर्व खोटे असून ते एक षडयंत्र आहे असे सांगितले आहे. तसेच त्यांनी कोर्टाने जारी केलेले समन्स मला मिळालेले नाही असे सांगितले आहे. १९९९ पासून ते आसाम राज्यातील नौगांग लोकसभेवर निवडून येत आहे.