चाळीसगाव- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील वऱ्हाडी लग्नासाठी चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथे आले होते. लग्न आटोपून परत जात असतांना देवळी गावाजवळील वळणाला चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला यात ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने तब्बल तीन पलटी घेतली. येथील रेल्वे कर्मचारी राहुल विष्णू खैरनार यांचे लग्न होते. लग्न लाऊन क्रुईसर क्रमांक एम.एच.४१ ए.एम.२०३४ ने नवरदेवाचे मित्र रेल्वेतील कर्मचारी परतत होते. जखमीवर चाळीसगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.