पाणी बचतीची घेतली शपथ
चाळीसगाव – पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील आभोणे तांडा येथे जलसंधारणच्या कामासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी श्रमदानासाठी पहाटे ६ वाजेपासून उपस्थित होते. शेतांवर बांध घालण्याचे काम जोमात व जोशात केले.
या श्रमदानासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील, डॉ प्रशांत शेळके, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. योगेश पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ राजेश चौधरी व आरोग्य कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी बचतीसाठी शपथ
यावेळी ग्रामस्थासह जेष्ठ महिला जलमित्र अधिकारी व कर्मचारींना रोटरी मिलेनियम अध्यक्ष डॉ. प्रमोद सोनवणे यांनी पाणी बचतीची शपथ घेतली. तसेच रक्कम रूपये १००० ची रोख आर्थिक मदत पाणी फाऊंडेशनच्या कार्यासाठी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भरकटणारे ग्रामस्थ पाहुन मन हेलावत होते. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुनिल पाटील, कळमडू पोलिस पाटील सुनिल मोरे,ग्रामपंचायत सदस्य कैलास महाले व सौ निर्मला रोहिदास राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रसंगी चाळीसगाव बीडीओ अतुल पाटील, पाचोरा बीडीओ गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, सहाय्यक बीडीओ अजितसिंग पवार, आदींसह सर्व विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.