भाजप सदस्य, नवमतदार नोंदणी अभियानास प्रतिसाद

0

जलसंपत्तीचे महत्त्व ओळखा – संपदा पाटील

चाळीसगाव – गेल्या उन्हाळ्यात राज्यातच नव्हे देशात पिण्याचे पाण्यासाठीची दाहकता आपण अनुभवली आहे. यासाठी पुढच्या पिढीसाठी पाण्याचे महत्व ओळखून धनसंपत्ती बरोबर जलसंपत्तीची गरज असून आपल्या छतावर पावसाळ्यात येणारे पाणी जमिनीत जिरवावे लागेल.यासाठी वाहून जाणारे पाणी हे रेन हार्वेस्टिंग च्या मदतीने आपल्याच परिसरात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिरवले तर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे भविष्यात दुष्काळाला सामोरे जायचे नसेल आणि जलक्रांती करायची असेल तर रेन हार्वेस्टिंगच्या सहायाने जलसंपत्ती वाढण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे, असे आवाहन उमंग समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी केले आहे.
शहरात भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी तसेच उमंग महिला परिवाराच्या माध्यमातून रेन हार्वेस्टिंग जनजागृती मोहीमअंतर्गत नुकतेच धुळे रोड,हनुमान वाडी शिवाजी चौक व शास्त्री नगर परिसरात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी बैठकीचेेे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घरोघरी जाऊन संपर्क व माहिती पत्रके देण्यात आली. शास्त्रीनगर परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या परिसरात आयोजित मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक शरद आव्हाड, बापूसाहेब पवार, सुनील पाटील,एकनाथ चौधरी, अ‍ॅड. प्रशांत पालवे, प्रा. सचिन दायमा, बंडू पगार मालपुरे, अविनाश चौधरी, हर्षल चौधरी, सुवर्णाताई राजपूत विजया पाटील,फय्याज शेख अनिल चव्हाण उपस्थित होते. सुरुवातीला प्रोजेक्टर स्क्रीनवर माहिती व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, खासदार उन्मेष पाटील यांचे आवाहनानुसार पाणी आडवा पाणी जिरवा, मन की बात जलके साथ या विषयी चित्रफीत दाखविण्यात आली. अभियानाचे प्रास्ताविक सह शहर प्रमुख प्रा. सचिन दायमा यांनी केले. सूत्रसंचालन बी.एन. पवार तर शहर प्रमुख अ‍ॅड. प्रशांत पालवे यांनी आभार मानले.


यांची होती उपस्थिती
यावेळी श्री.कोतकर, श्री.मालपुरे, भाऊसाहेब सोमवंशी, बबडी शेख, शुभम पाटील, युवराज चौधरी, धनंजय चौधरी, गौरांग चौधरी, शिवराज पाटील, दिनेश चौधरी, अनिलभाऊ चौधरी, फय्याज शेखसर, अर्जुन पाटील, अनिल चव्हाण, अमोल नानकर,सुरेश चौधरी, सुनिल रूपचंद चौधरी, रेवती अविनाश चौधरी, नीलिमा युवराज चौधरी, दीपक चौधरी, गोविंदा चौधरी, रामकृष्णहरी चौधरी, येवले काका वार्ड क्रमांक चार मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.