पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही

0

जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांचा इशारा

चाळीसगाव – भारतीय जनता हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो. मी गेले दहा वर्षे कार्यकर्त्यांसारखा नेत्यांच्या समोर बसलेला होतो. मात्र पक्षाची प्रामाणिक सेवा केली तेव्हा आज जिल्हाध्यक्ष पदाची संधी मला पक्षाने दिली. आपण देखील मतदार जोडणी आभियान यशस्वी करा. कुठलीही बेशिस्ती पक्षात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी दिला.
शहरातील नवजीवन सिंधी सेवा मंडळााच्या बजाज स्मृती हॉलमध्ये आज भाजप तालुका शहर बूथ प्रमुख, पेज प्रमुख, मंडल अध्यक्ष , शक्ती केंद्र यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील , जि. प. सदस्या मंगला जाधव, तालुकाध्यक्ष के. बी.साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीचे सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सुरेश महाराज हिंगोनेकर, अ‍ॅड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, धनजय मांडोळे , प्रा. सुनील निकम, अनिल नागरे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सुर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे, उमंग महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील, माजी अध्यक्ष लालचंद बजाज ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. चाळीसगाव शहर व तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे संघटन जिल्ह्यात क्रमांक एक वर आहे. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका अगोदर आपण पक्ष मजबूत करण्यासाठी नक्कीच परिश्रम घ्यावेत. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांनी ग्रामीण नोंदणी प्रमुख पदी माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, सह प्रमुख डॉ. महेंद्र बोरसे, शहर नोंदणी प्रमुख अ‍ॅड.प्रशांत पालवे, सह प्रमुख प्रा. सचिन दायमा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक के.बी. साळुंखे यांनी केले. सूत्र संचालन प्रा. सुनील निकम यांनी तर आभार अमोल नानकर यांनी मानले.