वृध्दाचे पैसे लांबविणार्‍या भामट्यास वाहतुक पोलीसांनी पकडले

0

चाळीसगाव – बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या हालचालींवर नजर ठेवून त्याच्याकडील ५ हजार रूपये हिसकावून पळ काढणार्‍या भामट्यास वाहतुक शाखेच्या दोन पोलीस कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्याला रंगेहात पकडले. वृध्दाचे पैसे परत मिळाले असून याप्रकरणी मालेगावच्या त्या भामट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, केशव हरी पाटील वय ६० (रा.पूर्णपात्रे लॉन्ससमोर टाकळी. प्र.चा) यांनी गुरुवारी भडगाव रोडस्थित स्टेट बँकेच्या शाखेतून पाच हजार रुपये काढले. आणि ते घराकडे जात असतांना बँकेच्या आवारात आधिपासूनच दबा धरून बसलेल्या भावनासिंग कालू सोलंकी या भामट्यांने केशव पाटील यांच्या हातातील पैसे हिसकावून पळ काढला. पैसे चोरट्याने नेल्याचे कळातच वृद्धाने आरडओरड केली. आणि त्या भामट्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत समोरुन येणारे वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी दिपक पाटील व नरेंद्र पाटील यानी वृध्दाच्या ओरडण्याचा अवाज ऐकूण त्यांना विचारपूस केली. त्यांनी घडलेला प्रकार सांगीतला असता, दोन्ही कर्मचार्यांनी लागलीच त्या भामट्याच शोध घेण्यास सुरुवात केली. पैसे चोरुन तो सिग्नल चौकामार्गे पळत असताना, दोन्ही कर्मचार्यांनी दुसर्या रोडने जावून त्यांचा पाठलाग करत, त्याला हॉटेल मनोरमा जवळ पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानतंर त्यांनी गुन्ह्यांची कबूली देत पैसे काढुन दिले.