तळेगाव आरोग्य केंद्रातर्फे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

0

वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी केले प्रबोधन

चाळीसगाव – येथील तळेगाव आरोग्य केंद्रात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आज राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस कमलापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव आरोग्य केंद्र व परिसरात घरोघरी जाऊन नागरिक महिलांचे प्रबोधन करण्यात आले. तर यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी जनतेला कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.
पाण्याचे स्त्रोत आटल्याने लोक पाणी साठवणूक करतात माञ स्टोरेज टाकींना अथवा भांड्यांना झाकत नाहीत त्यामुळे डेंग्यूचा एडिस इजिप्त हा साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालून लाखो डासांची उत्पत्ती करतो. व तेच डास डेंग्यू , चिकुनगुण्यासारखे आजार फैलावतात.
तरी साठवणुकीची भांडी व सिमेंटच्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा अवश्य धुवून कोरड्या केल्यास डासोत्पत्ती रोखली जाते व डेंग्यूचा प्रसर थांबतो तरी नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा असे प्रतिपादन डॉ प्रमोद सोनवणे यांनी केले. आचारसंहितेची अडचण असल्याने लोकप्रतिनिधीचा सहभाग घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ आशा राजपुत, आरोग्य सहाय्यक एल सी जाधव, विठ्ठल चव्हाण, सी बी राठोड, विजय देशमुख,अशोक परदेशी,मोहन राठोड , विष्णू राठोड , नितीन तिरमली, श्रीमती शितल सोळुंके , सौ.सविता पेंभरे, श्रीमती योगिता शिंदे, राकेश पाटील, विजय सोनवणे, विजय रणदिवे, उदयसिंग पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील रोटरी, लायन्स क्लब , खाजगी वैद्यकीय व्यावसायिक , स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून , जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक विद्यालय , कॉलेज, बँका, यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या सर्व स्तरातून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. बस स्थानक बाजार गर्दीच्या ठिकाणी डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत माहिती दिली जाणार आहे