चाळीसगाव- येथील पोलिस उपविभागीय अधिकारी नजिर शेख यांच्या जागी उत्तमराव कडलग यांनी नव्याने पदभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र या बदल्या विरोधात ही दोन्ही अधिकारी मॅट मध्ये गेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. दरम्यान नाजिर शेख हे वैद्यकीय रजेवर गेल्याचे समजते. नूतन पोलिस उपविभागीय अधिकारी यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. सहा सप्टेंबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत.ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील रहिवाशी असून मुंबई येथून नाशिक तर नाशिक येथून ते आज चाळीसगावी रुजू झाले आहे