लोकनायक प्रतिष्ठान तर्फे २९० जणांची नेत्र तपासणी

0

मोफत शस्त्रक्रियेसाठी १३ रूग्ण मालेगावला रवाना

चाळीसगाव – शहरातील व तालुक्यातील लोकनायक स्व. महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान व हिरकणी महिला मंडळ ,मारवाडी युवा मंच चाळीसगाव,रोटरी क्लब मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्रतपासणी व ऑपरेशन शिबीराचे आयोजन मानसिक आधार केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात एकूण २१०रुग्णांची तपासणी विनामूल्य तपासणी करण्यात आली त्यातून १३ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मालेगावला आजच रवाना करण्यात आले.
शिबिरात ज्या रुग्णांना गरज आहे. त्यांना मोफत चष्मे ही देण्यात आले. मालेगाव येथील तज्ञ डॉ. तुषार देवरे यांनी यावेळी रुग्णांची तपासणी केली.यावेळी ग.भा.इंद्रायणी राजपूत, लोकनायक स्व.तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्रसिंग राजपूत, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत, शेषराव पाटील, माजी नगरसेवक महेंद्र पाटील, नगरसेवक दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर, सविता राजपूत, स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई निकम, युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव, जिजाऊ समितीच्या अध्यक्षा सोनल साळुंखे, प्रीती रघुवंशी, भारती चौधरी, अनिता शर्मा, छाया पाटील ,लता जाधव, वैशाली काकडे, मीनाक्षी भोसले, उद्योजक योगेश अग्रवाल हे उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
या शिबीरासाठी राहुल राजपूत, प्रदीप राजपूत, छावा राजपूत, अण्णा गायके, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ पदाधिकारी दर्शना पवार, नकुल बाविस्कर, मारवाडी युवा मंचचे समकीत छाजेड, संजय अग्रवत,अजय जोशी, दत्तू दायमा, सुभाष करवा, प्रताप भोसले, दीपक राजपूत, सरदार राजपूत, पिंटू पवार, सुरेश परदेशी, धर्मा बच्छे, शरद पाटील, सचिन स्वार, सुजित पाटील, मुकेश राजपूत, जितेंद्र राजपूत यांनी परीश्रम घेतले.