मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून मावळ्यांना घडविली ऐतिहासिक सहल
चाळीसगाव – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची माती आपल्या मस्तकी लावावी ही आस प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात घर करून असते. परंतु बरेच शिवप्रेमींना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे रायगड वारी करणे अशक्य असते. याच गोष्टीला दुजोरा देत माझ्या तालुक्यातील प्रत्येक गरिबातल्या गरीब शिवप्रेमींनी रायगडाची माती आपल्या मस्तकी लावून शिवाजी महाराजांचे वीचार आपल्या मस्तकात घ्यावे आणि आपल आयुष्य यशस्वी करावे म्हणून उद्योजक मंगेश चव्हाण या अवलियाने स्वखर्चातून गेल्या सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या ‘रायगड वारी’ चे आयोजन करून चाळीसगाव तालुक्यातील साडेतीनशे शिवप्रेमींच्या मस्तकी रायगडाची माती लावण्याचे कार्य केल्याने त्यांचं सर्व शिवप्रेमी कडून कौतुक होत आहे.
तरुण मुले भारावली
तीन दिवसीय रायगड वारी सकाळी गेल्या पाच तारखेला दहा वाजेच्या सुमारास शहरातील सिग्नल पॉइंट येथून काढण्यात आली त्यावेळी शहरातील सर्व शिवप्रेमी व उद्योजक मंगेश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील , पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते संजय पाटील, नगरसेवक मानसिंग पवार, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, युवा कार्यकर्ते भूषण पाटील , योगेश खंडेलवाल , भावेश कोठावदे , पर्यावरण प्रेमी शांताराम पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ्यांच्या काढला दोन लाखांचा विमा
प्रत्येकाने सोबत घ्यावयाच्या वस्तू व मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या.मोबाईल चार्जर पॉवर बँक, १ ड्रेस (किल्ल्यावर पोहोचल्यावर व्हाईट शर्ट हा ड्रेसकोड)
ओळखपत्र (आधार/पॅन कार्ड), वैयक्तिक खरेदी व खर्चासाठी पैसे, पायात स्पोर्ट शूज, बॅगेत बसेल एवढ्या मापाची छत्री, सौंदर्य प्रसादने ,तेल, पावडर, कंगवा, कुठल्याही प्रकारचा आजार, अलेरजि किंवा त्रास असल्यास संबंधित गोळ्या औषधी, किल्ला चढाई सुरू करतांना प्रत्येकी दोन पाणी बॉटल आयोजकांतर्फे देण्यात आल्या होत्या. अनेकदा दुर्दैवी घटना घडतात त्यामुळे दोन लाखांचा सामूहिक विमा देखील उतरविण्यात आला होता.
यांचा होता सहभाग
पाच वातानुकूलित बसेस, पाच खाजगी वाहने अशी दहा वाहनातून साडे तीनशे मावळ्यांना ही एतीहासिक सफर घडवून आणली. या मावळ्यांचे खासदार युवराज संभाजीराजे भोसले, युवराज रणजित राजे, पालकमंत्री डॉ. रवींद्र चव्हाण, आमदार विजय शिवतारे यांनी आयोजक मंगेश चव्हाण यांचे अभिनंदन केले . याप्रसंगी मंगेश चव्हाण यांचे घरी युवराज संभाजीराजे यांनी दिलेल्या भेटीचा व आदरातिथ्य याची आठवण सांगितली . याप्रसंगी शांताराम पाटील, भावेश कोठावदे, योगेश खंडेलवाल, भुषण पाटील राज,े अविनाश चौधरी, अभय वाघ, निखिल अग्निहोत्री, अभय परदेशी, कुणाल तांबे, भास्कर पाटील, जगदीश चव्हाण, ललित महाजन, प्रणव साबळे, सुनील रणदिवे, राहुल धनगर, जयश्री चौधरी, रोहन पाटील, यांच्यासह डॉ. रोहन पाटील हे देखील सहभागी झाले होते