मुख्याधिकार्यांना दिले मागण्यांचे निवेदन
चाळीसगाव – चाळीसगाव पालीकेतील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगारांना सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबीत मागणी तात्काळ मान्य करण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्यावतीने पालीकेत सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचार्यांच्यावतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी मानोरकर यांनी मागण्यांचा पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सफाई कर्मचार्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव नगरपालीकेतील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सपाई कामगारांना सातवा वेतन आयोग लागु करण्यात यावा याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे पालिकेतील संपुर्ण कर्मचार्यांचा सातवा आयोगाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, पडावु इमारतीचे तात्काळ बांधकाम सुरू करावे, संघटनेमार्पत सादर केलेल्या शासननिर्णयानुसार सपाई कर्मचार्यांना मोफत सदनिकांसाठी पाठपुरावा करावा, अंशदायी योजना रद व्हावी व जुनी पेन्शंनयोजना लागु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, रोजंदारी कर्मचार्यांच्या समावेशनाबाबत त्वरीत कारवाई करण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना दिलेल्या निवेदनावर अमर गोयर, काशिनाथ चंदेले, मनोज कछोटे, मंगलाबाई जाधव, विशाल गोयर, वासुदेव गोयर, जनार्दन चंदेले, राधा कंजरे, उमेश गोयर, वाल्मीक मरसाळे, सुनिल सांगीले, शामलाल गोयर यांच्यासह कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.