शेतीला 24 तास वीज पुरवठा या मागणी साठी अनोख्या पद्धतीने आंदोलन पिंपरी सेकम संघर्ष समिती येथे चंद्रकांत चौधरी यांनी दिली भेट

प्रकल्प उभा करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या नावाने प्रकल्प सुरू केला जातो कमी दरात जमिनी लाटल्या जातात प्रकल्प उभा राहिल्यावर मात्र प्रदूषणाचां भार सहन करणारे गावे मात्र दुर्लक्षित केले जातात .शेतकरी आंदोलन संघर्ष समिती पिंपरी सेकम तालुका भुसावळ, गेल्या 08 दिवसापासून शेतीला 24 तास वीज मिळावी या प्रमुख मागणी साठी पिंपरी सेकम संघर्ष समिती भुसावळ मार्फत गावाजवळील वॉटर सप्लाय गेट जवळ आंदोलनाचा आज 08 वां दिवस निमित्त एन. ए. पी .एम .चे नेते श्री चंद्रकांत चौधरी यांनी आंदोलन स्थळी रात्री ठीक 07.30 भेटी दीली. व आंदोलनाचा आढावां घेतला व आंदोलन सहभागी आंदोलकांना आधार दिला. एनएपीएम च्या प्रमुख ज्येष्ठ नेत्या मेधाताई पाटकर यांच्याशी फोनवर संवाद साधण्यात आला. सनदशीर मार्गाने हा लढा सुरू राहील असे पिंपरी सेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत भाऊ चौधरी यांनी सांगितले. शेतीला 24 तास नेहमी प्रमाणे वीज मिळावी. महावितरण कंपनीने अचानक एक एप्रिल 2023 पासून जे भार नियमन सुरू केलेले आहे यामुळे व्यापारी पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी राजा हवालदिल झाला आहे या मागणीसाठी राष्ट्रीय नेते विवेकानंद माथने, कोराडी वीज प्रकल्प विरुद्ध लढणारे पर्यावरण अभ्यासक सुनील पालेवार यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणे झाले लवकरात मागण्या मान्य झाल्या नाही तर सनदशील मार्गाने आंदोलन तीव्र करण्यात येईल असे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले. प्रगतिशील शेतकरी रवींद्रसिंग चाहेल यांनी म्हटले की भारनियमन रद्द व्हावे शेतातील पीक नष्ट होत आहे पुढील खरीप हंगामाची तयारी करता येत नाही असे खंत व्यक्त केली. संघर्ष समितीचे 50 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी असून बैलगाडी व गुर- ढोरे घेऊन आंदोलन स्थळी उपस्थित आहेत…….