चांद्रयान-२ मुळे भारतीय वैज्ञानिकांचे श्रेष्ठत्व सिद्ध; ‘मन की बात’द्वारे मोदींचे कौतुक

0

नवी दिल्ली: दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज रविवार 28 रोजी दुसऱ्यांदा ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी इस्रोने चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण केल्याने शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ‘चांद्रयान-२ पूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. चांद्रयान २ मुळे भारतीय वैज्ञानिक श्रेष्ठ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे’, अशा शब्दात मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांना कौतुक केली. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.

यावेळी पाणी वाचविण्यासाठी वेगळी नीति तयार करणारे मेघालय देशातील पहिले राज्य ठरले असल्याने मोदींनी उल्लेख केला. यानंतर मोदींनी अमरनाथ यात्रे यशस्वी आय़ोजनासाठी काश्मीरच्या नागरीकांची प्रशंसा केली. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा अमरनाथ यात्रेत सर्वाधिक भाविक सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. अमरनाथ यात्रेकरुंचं काश्मीरी लोकं मोठ्या आनंदाने स्वागत करतात आणि त्यांची मदत व सेवा ते करत असतात असेही मोदी म्हणाले.

देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेले जाईल. विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे 7 डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेले जाणार आहे.