बंगळुरु-चांद्रयान 2 चे प्रक्षेपण 22 जुलै ला करण्यात आले.आता उद्या दि.20 रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक मंगळवारी लिक्विड इंजिन प्रज्वलित करतील. सकाळी 8.30 ते 9.30 च्यादरम्यान ही प्रक्रिया पार पडेल,असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले.चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील . विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. 7 सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.