नवी दिल्ली: भाजपचे नेते माझी हत्या माझ्या पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) यांच्या कडून घडवू शकतात, असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ज्या प्रमाणे इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्याच प्रमाणे माझी हत्या होण्याची भीती मला आहे, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या होणार असून, २३ में ला त्याचा निकाल लागणार आहे. लोकसभा निकालाच्या आधी हे विधान केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे.
माझे सेक्युरिटी गार्ड हे भाजपला माझा रिपोर्ट करतात. माझ आयुष्य दोन मिनिटात संपू शकते अस धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. प्रचार सभेनंतर प्रत्येक नेते चर्चेत राहण्यासाठी काहीही करत राहतात असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. या अगोदर त्यांनी मोदीं पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे विधान २०१६ साली केले होते.