ऐतिहासिक आरके स्टुडिओची मालकी आता ‘गोदरेज’कडे !

0

मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षांनंतर १९४८ साली स्थापन झालेल्या ऐतिहासिक अशा आरके स्टुडिओची जमीन खरेदी ‘गोदरेज प्रोपर्ट्रीज’ कंपनीने केली आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये हा स्टुडिओ आहे. आरके स्टुडिओचे रणधीर कपूर यांनी ‘चेंबूरमधील ही संपत्ती माझ्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या अनेक दशकांपासून आरके स्टुडिओ कार्यरत आहे. आम्ही या संपत्तीसाठी गोदरेजची निवड केली असल्याचं’ त्यांनी म्हटले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षांनंतर १९४८ साली आरके स्टुडिओची स्थापना करण्यात आली होती. चेंबूरमधील या स्टुडिओत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. २.२ एकर असलेल्या या जमिनीच्या ३३ हजार स्क्वेअर मीटर भागात आता लग्जरी अपार्टमेंट डेव्हलप करण्यात येणार आहेत.

आरके फिल्म्सने बॉलिवूडला ‘बरसात’ (१९४९), ‘आवारा’ (१९५१), ‘बूट पॉलिश’ (१९५४), ‘श्री ४२०’ (१९५५) आणि ‘जागते रहो’ (१९५६) यांसारखे जबरदस्त चित्रपट दिले आहेत. ‘जिस देश में गंगा बहती है’ (१९६०), ‘मेरा नाम जोकर’ (१९७०), ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ (१९७३), ‘सत्यम शिवम सुंदरम’ (१९७८), ‘प्रेम रोग’ (१९८२), ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती आरके स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे.