मोहाली : प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान कायम टिकविण्यासाठी आज चेन्नई सुपरकिंग्स अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबशी लढणार आहे. मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी विजय मिळविला होता. संघाचे १३ सामन्यांत १८ गुण आहेत. पंजाबविरुद्ध विजय मिळाल्यास २० गुण होतील. चेन्नईची बरोबरी करणे अन्य संघांसाठी शक्य नाही.