ईरा त्रिवेदीनेच मागितला ‘किस’; चेतन भगत यांनी शेअर केला २०१३ मधील ई-मेल

0

मुंबई – लेखक चेतन भगत यांच्यावरही मोहिमदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. लेखिका ईरा त्रिवेदी यांनी भगत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, भगत यांनी ईरा यांचा 2013 रोजी आलेला ई-मेल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ईरा त्रिवेदी यांनीच Miss U Kiss U म्हणत मला किस मागितला होता असे भगत यांनी मेल शेअर करत सांगितले आहे.

सध्या#Me Too मोहिमेतून अभिनेते, दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी आणि लेखकांवरही लैंगिक शोषणाचे आरोप होत आहे. त्यातच, लेखक चेतन भगत यांच्यावरही लेखिका आणि योगा टीचर ईरा त्रिवेदी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. कशाप्रकारे चेतन भगत यांनी आपल्याला एका खोलीत बोलावून किस करण्याचा प्रयत्न केला.