पुजाराची दीडशतकी खेळी; नव्या विक्रमाला गवसणी !

0

सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या आणि चौथा कसोटी सामना सध्या सुरु आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या चेतेश्वर पुजाराने आज दुसऱ्या दिवशीही दमदार खेळीचे प्रदर्शन केले. पुजाराने १५० धावा पूर्ण करून स्वतःच्या नावे नवा विक्रम केला आहे. १९३ धावा त्याने केले. १५० धावा पूर्ण करून पुजारा आता पाचवा असा फलंदाज ठरला आहे की, ज्याने सिडनी क्रिकेट मैदानावर १५० हून जास्त धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर(२४१, १५४), रवी शास्त्री(२०६), व्हीव्हीएस लक्ष्मण(१७८, १६७), सुनील गावस्कर(१७२), तर पुजारा(१९३) ही या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

पुजारा ऑस्ट्रेलियाविरोधात मालिकेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कोहली पहिल्या स्थानी, तर सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानी आहेत. या मालिकेत पुजारा ऑस्ट्रेलियाविरोधात एखाद्या सराव सामन्यादरम्यान पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या यादीत वीरेंद्र सहवाग सर्वात वरच्या स्थानी आहेत.

पुजारा एका मालिकेत ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या फलंदाजांमध्ये राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विजय हजारे आणि कोहलीच्या बरोबरीत आहे. त्यानं मालिकेत आतापर्यंत 1135 चेंडूंचा सामना केला आहे. पुजारानं या आधाही मेलबर्न सीरिजमधल्या तिसऱ्या सराव सामन्यात जबरदस्त शतक झळकावलं होतं.