छगन भुजबळ यांचे राजकारणात जोरदार ‘कमबॅक’

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली आहे. सध्या ते मुंबईत त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहे. उद्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ट्वीट केले आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते लवकरच राजकारणात जोरदार ‘कमबॅक’करणार आहे.

 

”माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,” असे ट्वीट भुजबळांनी केले आहे.