जामीन मिळाल्यावर पहिला फोन पवारांचा
छगन भुजबळ यांचा बाहेर झाल्यानंतर केला संवाद
मुंबई :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आपल्या सांताक्रूझ येथील घरी आले. यावेळी आपल्या निवासस्थानी भुजबळांनी मीडियाशी संवाद साधला. भुजबळांना केईएम रुग्णालयातून सोडल्यांनंतर ते सांताक्रूझच्या घराकडे रवाना झाले. यावेळी रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर “झाले मोकळे आकाश, अशी भावना आहे” असश शब्दात भावना व्यक्त केल्या. “सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही ते शोधायला हवं. महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचा मला आनंद आहे. भाजपच्या खासदारानं सांगितलं होतं, महाराष्ट्र सदन सुंदर आणि बनानेवाला अंदर.”, असे भुजबळांनी महाराष्ट्र सदन प्रकरणावर भाष्य केले.
पडत्या काळात शिवसेनेच्या दोन चांगल्या शब्दांबद्दल भुजबळ यांनी शिवसेनेचे आभार मानले. तसेच, शिवसेनेशी ऋणानुबंध आहेत अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर, जामीन मिळाल्यावर पहिला फोन शरद पवारांचा आला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. “पडत्या काळात शिवसेनेने शब्दांचा का होईना, आधार दिला. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे. त्यामुळे काळजी असणारच. ऋणानुबंध असतातच.” असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या स्वादुपिंडावर उपचार केले जात असून आणखीन काही महिने हे उपचार सुरू राहणार आहेत. त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया केल्या जातील, असे स्वतः छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून लवकरच या आजारातून आपण बाहेर येऊ आणि कामाला लागू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. , परत हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल. काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील, त्यातून बरं वाटलं तर शंभर टक्के कार्यक्रमाला हजर राहणार.”, असे भुजबळांनी स्वत:च्या तब्येतीबाबत सांगितले.
भुजबळ यांना ४ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. त्यानंतर रविवारी त्यांच्या सुटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी सुटका झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना केईएम रुग्णालयात रहावे लागले होते.