छगन भुजबळ लढणार वैजापूर मतदार संघातून?

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे वैजापूर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढतील अशी चर्चा सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात सुरु आहे. छगन भुजबळ यांनी किंवा कुटुंबाच्या कुठल्याही व्यक्तीने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करावे अशी मागणीचे निवेदन समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिले आहे. वैजापूर मतदार संघाची चाचपणी सध्या भुजबळांकडून सुरु असल्याची चर्चा होत आहे.

काही महिन्यावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासून उमेदवारांनी आपला मतदार संघाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्हा भुजबळांचा बालेकील्ला मानला जात होता. लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे येवला मतदार संघात भुजबळांना हि निवडणूक अवघड जाईल असेही बोलले जात आहे.

वैजापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांची चिंता वाढली आहे.
प्रत्यक्षात भुजबळांनी जर वैजापूरमधून लढवण्याचे ठरवले तर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना पक्षाकडून इतर मतदारसंघातून उमदेवारी मिळणे अशक्य आहे. दुसरीकडे भुजबळांना पक्षाने वैजापुरातून उमदेवारी दिली तर भाऊसाहेब चिकटगावकर नेमके काय निर्णय घेणार याची चर्चा येवला मतदारसंघात पाहायला मिळत आहे.