पुणे :– छावा संघटनेच्या’ वतीने पुण्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी आणि शिवशंभुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांना बुंदी वाटण्यात आली. ‘छत्रपती संभाजी महाराजांचे विचार अवगत करा, तरच संभाजी महाराजांचे विचार मोठे होतील’ अशी भावना छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी छावा संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश सोनवणे,अमोल वीर, समीर वीर, व्दारकेश जाधव, गणेश गवळी, किरण राजपुत, संकेत चव्हाण,ज् ञानेश्वर बोबडे, दादाराव बोबडे, प्रवीण भोसले, विक्रम कदम, शैलेश तारडे, आकाश शेलार, विशाल देठे व शिवशंभुभक्त उपस्थित होते.