छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण हवा?; राहुल गांधींनी थेट कार्यकर्त्यांना केले फोन !

0

नवी दिल्ली- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी काहीशी मदत घ्यावी लागणार आहे. दरम्यान छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री पदावरून कॉंग्रेसमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर हा पेच निर्माण झाला आहे. त्यासाठी राहुल गांधींनी थेट कार्यकर्त्यांना फोन करून नवीन मुख्यमंत्री कोण? असावा याबाबत विचारणा केली आहे.

जनतेला कोण मुख्यमंत्री म्हणून हवे याबाबत कार्यकर्त्यांना अंदाज असल्याने राहुल गांधी यांनी थेट कार्यकर्त्यांशीच संपर्क केला. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस १५ वर्षानंतर सत्ता स्थापन करणार आहे. ९० पैकी ६७ जागांवर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. भाजपला फक्त १५ जागा मिळाल्या आहे.