छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

0

रायपूर – छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. येथे ७२ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १ कोटी ५३ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण १०७९ उमेदवार निवडणुकांच्या रिंगणातून आपले नशीब आजमावत आहेत. भाजपाकडून ९ मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या ३ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात १८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी ७६.२८ टक्के मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांसाठी मतदान होत असून, ११ डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे.