मुख्यमंत्री रमणसिंग यांनी दिला राजीनामा !

0

रायपूर-छत्तीसगडसह देशातील पाच राज्याच्या विधासभा निवडणूकींची मतमोजणी सध्या सुरु आहे. छत्तीसगडमध्ये प्रस्थापित भाजप सरकार जनतेने उलथवलेले आहे. कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दरम्यान मुख्यमंत्री रमणसिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी तयार असलेल्या कॉंग्रेसचे रमणसिंग यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या पराभवाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीवर या निवडणुकीचा काही परिणाम होणार नाही असा दावाही रमणसिंग यांनी केला आहे.