रायपुर: ओडीसा राज्याला मोठ्या प्रमाणात ‘फनी’ या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वादळामुळे ओडीसामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. दरम्यान ओडीसा राज्याला देशभरातून मदतीचा हात मिळत आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारने प्रत्येकी १०-१० कोटींचा निधी ओडीसाला दिले आहे. आता छत्तीसगड राज्याने देखील ओडीसाला मदतीचा हात दिला असून ११ कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही मदत जाहीर केली.