छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार !

0

रायपूर: छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड चकमकीत ठार झाला आहे. 9 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये भाजपचा ताफा प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मंडावी हे ठार झाले होते तर तर पाच जवान शहीद झाले होते. मादवी मुय्या असे या मास्टरमाइडचे नाव आहे. त्याच्यावर आठ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी एक रायफल आणि सहा काडतूसे जप्त केली आहेत. दंतेवाडा येथे झालेल्या हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते तर डीडीच्या कॅमेरामनचा मृत्यू झाल होता.

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे ११ एप्रिल रोजी मतदान होणार होते. या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बचेली परिसरातील एका गावात भाजपची सभा होती. ती आटोपून नकुलनारकडे परतत असताना शामगिरी परिसरात कुआकोंटाजवळ नक्षलवाद्यांनी दुपारी चारच्या सुमारास भूसुरुंग स्फोट घडवून आणला.