कॉंग्रेसकडून आश्वासनपूर्ती: छत्तीसगडमध्ये तांदळाला २५०० रुपये हमीभाव

0

रायपूर-छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांचा मुख्य पिक म्हणजे तांदूळ. मात्र येथील शेतकऱ्यांना तांदुळाला दिला जाणारा हमीभाव कमी होता. हाच धागा पकडत छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ता आल्यास २५०० रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. काल मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर लागलीच तांदळाला २५०० रुपये हमीभाव जाहीर केले. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनाचे कॉंग्रेसकडून पूर्ती होत असतांना दिसत आहे.

काल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. त्यानंतर तांदळाला २५०० रुपये हमीभाव जाहीर केले.

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सरकार येण्यामागे तांदळाला हमीभाव देण्याचा मुद्दा महत्त्वाचा होता.