छत्तीसगड :- छत्तीसगडमधील बिजापूर येथे आज सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना मोठ यश मिळालं आहे. गडचिरोलीत सुमारे ३७ नक्षलवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर बिजापूरमध्ये ही कारवाई झाल्याने नक्षली संघटनांना मोठा हादरा बसला आहे.या कारवाईमुळे राज्यातील नक्षली चळवळीचे कंबरडेच मोडले.
छत्तीसगड – तेलंगण सीमेवर ही चकमक झाली. यावेळी पोलिसांनी एक एसएलआर, रायफल, ६ रॉकेट लाँचर आणि तीन ग्रेनेड हस्तगत केले. दरम्यान, नक्षलवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीमध्ये तीन जवानदेखील जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.