नवी दिल्ली: पी. चिदंबरम यांना तिहार कोठडीत न पाठवता त्यांना सीबीआयच्याच कोठडीत ठेवण्यात यावी असा निर्णय काल सोमवारी सुप्रीम कोर्टाने दिला होता. दरम्यान आता सीबीआयने पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवा अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. सीबीआयला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची कोठडी नको आहे. त्यांना तिहारमधील तुरुंगात न्यायालयीन कोठडी देऊन पाठवावे असे सीबीआयने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने मात्र ५ सप्टेंबरपर्यंत पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी कायम ठेवली आहे. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
काल सोमवारी झालेल्या घडामोडींमध्ये पी. चिदंबरम यांना अंशतः दिलासा मिळाला. कारण सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात चिदंबरम यांची रवानगी करु नये असे म्हटले. तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवा असा प्रस्ताव चिदंबरम यांनी कोर्टाला दिला होता. त्यानंतर आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी.चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आता याच संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करावी असे म्हटले आहे.