नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई हे शक्तीशाली आहेत. त्यांच्याविरोधात सीसीटीव्ही फुटेज असून हा एक भक्कम पुरावा आहे. यामुळे देशाच्या प्रमुख तपास संस्थांच्या प्रमुखांची भेट घ्यायची असल्याचा दावा पिडीतेचे वकील उत्सव बैन्स यांनी केला आहे.
एका बडतर्फ महिला कर्मचार्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवला आहे. या असभ्य वर्तनाच्या आरोपांची ‘इन हाऊस’ पद्धतीने चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले असून त्यासाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची समिती नेमण्यात येणार आहे. सरन्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाची अशा प्रकारे सहकारी न्यायाधीशांकरवी चौकशी केली जाण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या 70 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने बैन्स यांना परवानी दिली असून दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी सुरु करण्यात येणार आहे. बैन्स हे सीबीआयचे संचालक, दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि आयबीचे संचालक यांना एका बंद खोलीमध्ये दुपारी 12.30 वाजता भेटणार आहेत. त्यांच्यासमोर ते हे पुरावे ठेवतील. तसेच यानंतर न्यायालयासमोर सादर करतील. दरम्यान, गोगोई यांच्यावर आरोप करणार्या महिलेचा जामीन रद्द करण्यासाठीच्या अर्जावर 3 मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. पटियाला उच्च न्यायालयामध्ये यावर सुनावणी होणार आहे.