अलिबाग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले आहे. आज देखील ते हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले आहे. आज पेण येथे त्यांच्या हेलिकॉप्टर अपघात झाला असता. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.
हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती.