पुरी: ओडीसाला फनी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. देशभरातून मदतीचे हात दिले जात आहे. दरम्यान ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहे. त्यांच्या या निर्णयाचा कौतुक होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ओडीसाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री पटनायक यांच्यासोबत आढावा बैठक देखील घेतली. केंद्राने १००० कोटींची मदत जाहीर केली आहे. अनेक राज्य सरकार ओडीसाला मदत करत आहे.