मुख्यमंत्री नियमाचे कठोर: जवळच्यांनाही सोडत नाही

0

मुंबईः पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड काल प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तीप्रदर्शन झाल्याचे काल पहायला मिळाले. पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कालच्या पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. संजय राठोड यांच्यावरही मुख्यमंत्री कारवाई करतील असे बोलले जात आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केले आहे.

पोहरादेवी येथे नियम मोडले गेले आहे. उद्धव ठाकरे हे नियमाचे पालन करण्यात अतिशय कठोर आहेत, ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. या प्रकरणात राज्य सरकारपणे कायद्याचे पालन केले जाईल,’ असे सांगितले आहे. त्यामुळे मंत्री राठोड यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत.