बंगळूर-भाजपला बहुमतचा विश्वास नसल्याने मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. बहुमत चाचणी नंतर भाऊक भाषण देण्याची मुख्यमंत्री येडियुरप्पा तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बहुमताची जुळवाजुळव भाजप करीत आहे मात्र जुळवाजुळव होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बहुमतचे चिन्ह नाही
३.३० वाजता सभागृह सुरु होणार आहे मात्र अद्याप बहुमताची जुळवाजुळव होण्याचे चिन्ह नसल्याने भाजपकडून राजीनामा देण्याबाबत ‘ब’ तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री यांचे १३ पानाचे भाषण तयार झालेले असून ते भाषण भाऊक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॉंग्रेसचे आमदार फुटलेले नाही
बंगळूर-कॉंग्रेसचे प्रताप गौडा पाटील व आनंद सिंह हे दोन आमदार गायब असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कॉंग्रेसचे डी.के.शिवकुमार यांनी कॉंग्रेसचे कोणतेही आमदार गायब नसून गौडा व आनंद सिंह आमच्या सोबत असल्याचा दावा केला आहे. आमदार आनंद सिंह भाजपला मतदान करणार असे सांगण्यात येत आहे मात्र आनंद सिंह कॉंग्रेसला मतदान करतील असा विश्वास देखील शिवकुमार यांनी व्यक्त केला. प्रताप गौडा व आनंद सिंह सोबत असून ते दोन्ही विधानसभेत दाखल झाले आहे.