पिस्तुलचा धाक दाखवत व्यापार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न फसला

0

दोन व्यापारी जखमी,हवेत गोळीबार: एका संशयितास अटक

चोपडा – पिस्तूलाचा धाक दाखवून तीन जणांनी आज पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास वेले चहार्डी रस्त्यावरील चोपडा शेतकरी साखर कारख्यानाच्या गेटजवळ शेळी – मेंढी चा व्यापार करणार्‍या दोन व्यापार्‍यांना चहार्डी कडे जात असताना गाडी अडवून चार चोरट्यानी पिस्तुल चा धाक दाखवत त्याच्या जवळील ३ लाख ६० हजाराची रक्कम लुटण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला. यात व्यापार्‍यांकडील सुमारे दहा हजारांची रोख रक्कम व मोबाईल घेऊन चोरटे पसार झालेत.परंतु काहीतासात दरोडा प्रकरणात पोलिसांनी चहार्डी छोटू बापू धनगर यांना ताब्यात घेऊन त्याला खाकीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची दिली आहे. त्यामुळे यात दरोडेखोर म्हणून चहार्डी येथील राजेश भिल याला अटक केली असून महेंद्र भिल व राहुल भिल याच्या अटक कामी पोलीस पथक रवाना झाली आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी दिली.
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी पत्रकार परीषदेत माहिती देतांना सांगितले की, दिलीप काशिनाथ धनगर(५०) रा. चहार्डी, कलीम सलीम खाटीक (३२) रा. हातेड, छोटू बापू धनगर रा. चहार्डी हे हैदराबादहुन शेळया- मेंढ्या विकून वेले -चहार्डी रस्त्यावरून महिंद्रा पिकअप ( क्र एम एच १८-बी जी ०६६८ ) गाडीने चहार्डीकडे घरी जात असताना चोसाका गेटजवळ चोरट्यानी गाडी अडवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात दिलीप धनगर व कलीम खाटीक यांच्या डोक्याला बंदूक लावून हवेत गोळीबार करण्यात आला. त्यांच्याकडून सुमारे दहा हजार व मोबाइल हिसकावून घेतला त्यानंतर डिक्कीत असलेले तब्बल ३ लाख ६० हजार रु असलेली बॅग त्यांनी काढुन घेतली. दिलीप धनगर आणि कलीम खाटीक यांनी प्रतिकार केल्यानंतर त्याना सळईने मारहाण करण्यात आली. आरोपींनी डिक्कीतील पैश्याची बॅग घेऊन जात असताना दिलीप धनगर,कलीम खाटीक यांनी आरोपींशी झटापटी करीत त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात आरोपींच्या हातातून पैश्यांची बॅग खाली पडून ती कलीम खाटीक यांनी उचलून वेले गावाकडे पळ काढला. त्याच वेळी चालक संतोष जाधव हा आरडाओरड करीत वेले येथील गाईंच्या गोठ्यावर आला. माजी उपसरपंच विनोद पाटील,वेले व त्यांचे बंधू लिलाधर पाटील हे गाईचे दूध काढण्यासाठी आले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी लाकडी दंडुके घेत चोरांच्या दिशेने धाव घेतली. हे सर्व पाहिल्या बरोबर दरोडेखोर पसार झाले .पळ काढत असतांना त्यांच्या हातातील सळई, पिस्तूल (गावठी कट्टा ) चोसाका गेटच्या मागील बाजूस खाली पडला तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरोडेखोर व व्यापारी यांच्या झटापटीत व्यापारी दिलीप धनगर याना पायाला तर कलीम खाटीक याला पोटात मार लागल्याने ते जखमी झाले असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संशयित ताब्यात
गुन्हा घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक गोर, चोपडा उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल, जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो नि. बी. जी. रोहम, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक यादव भदाणे, पो.उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, सुधाकर लहारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाहणी केली. अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. यात चहार्डी येथून ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाची विचारपूस करीत असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राजेश गोरख भिल(२८) रा. चहार्डी यास ताब्यात घेतले आहे. तर छोटू धनगर व संतोष जाधव यांची पोलीस कसून चौकशी करीत आहे. इतर दोघे महेंद्र भिल,राहुल भिल (रा चहार्डी) हे फरार असून त्याना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. याबाबत चोपडा पो.स्टे ला भाग ५ गुरन ९१/२०१९ भादवी.क३९४,३४१,३२३,भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,३/२७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.